भिलदरी तांडा येथे 500 रोपांचे वृक्षरोपण करून वनमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
BY : YML NEWS – कन्नड
भिलदरी गावाचे युवा नेतृत्व ऋषिकेश भरत चव्हाण यांच्या अतोनात प्रयत्नाने ग्रीन मेसोन फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाने व सामाजिक वन विभागाच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने भिलदरी तांडा येथे वनमहोत्सवा निमित्ताने 500 रोपांचे वृक्षरोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सर्व प्रथम गावाच्या परिसरात किती झाडे लावून वाचवली जातील याचा गाड अभ्यास करून रस्ते कडेला आणि गावातील मंदिर परिसरात खड्डे खंदुन ठेवण्यात आली आणि वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे हे गावकऱ्यांना समजावून सांगत वन महोत्सवात सहभाग नोंदवून वृक्षलागवड करून गावकऱ्यांनी ते जगवावी आणि त्यापासून होणाऱ्या लाभाचा फायदा एक न एक दिवस नक्कीच गावाला हिरवगार निसर्गाचे वरदान म्हणून लाभेल आणि एक वेगळी ओळख गावाची निर्माण होईल असे ग्रीन मेसोन फाउंडेशनच्या टीम ने आपल्या बोलण्यातून व्यक्त केले. यावेळी ग्रँड मास्टर्स मशिन्स pvt ltd चे मिलिंद केळकर साहेब,समीर केळकर साहेब, ग्रीन मेसोन फाउंडेशनचे सर्वासर्वी तुषार पवार साहेब, निर्मिका अठले मॅडम, नागद विभागाचे वनपाल नलावडे साहेब, ग्रीन मेसोन फाउंडेशन कन्नड इन्चार्ज गौरव गाडे साहेब, माजी सरपंच बाबुसिंग राठोड,सरपंच संजय चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संजय ताराचंद चव्हाण,पत्रकार भाईदास पवार,सोसायटीचे माजी चेअरमन संजय आबा पाटील,बद्री चव्हाण, अनिल मोरे, जब्बर शेट,युवराज राठोड,दीपक राठोड,देवा राठोड,तुषार,राहुल,नितीन, वाडीलाल आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
No comments