web-ads-yml-728x90

Breaking News

कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक

 


BY YML NEWSमुंबई

राज्यात शिंदे सरकार ( Shinde Govt ) अस्तित्वात आल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद ( Cabinet Minister ) देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला ( MLA ) 100 कोटी रुपयेची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Mumbai Crime Branch ) या प्रकरणात पोलिसांनी ( Police ) वेशांतर करून, हॉटेल ओबेराय येथे एका आरोपीला अटक ( accused arrested ) केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आले आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत 4 आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मंत्रीपद देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेच्या ( Mumbai Crime Branch ) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या टोळीने 3 ते 4 आमदारांना गळाला धक्कादायक लावल्याची माहिती मिळाली होती. त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

No comments