web-ads-yml-728x90

Breaking News

School Starts in Mumbai : शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईत आजपासूनच शाळा सुरू

 


BYYML NEWSमुंबई

मुंबईतील महापालिका शाळा ( Mumbai Municipal Corporation Schools ) आणि खासगी व्यवस्थानाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या शाळा आज सोमवारी (13 जून) सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. असेच आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, हे आदेशाला केराची टोपली दाखवून मुंबईतील शाळा आजपासून सुरू होत आहेत. यामुळे संभ्रम निर्माण झाल्याची टीका शिक्षक संघटनेने केली आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात 13 जून पासून होते. गेली दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. यंदा कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने विदर्भातील शाळा 27 जूनपासून तर उर्वरित राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याची तसेच पहिल्या दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रक जारी करून यासाठीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. शिक्षण विभागाने विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत मुंबईतील शाळा मात्र आज 13 जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत.

 

No comments