web-ads-yml-728x90

Breaking News

Murbad News | हजारो कुटूंबाच्या बर्बादीवर पडदा टाकून मातानगर,सोनारपाडा रस्त्यावर क्लब,जुगार अड्डा....!

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यात आता पाच वर्षापासुन एक नविन उद्यौग पाकोळी (जुगार) मोठया प्रमाणात फोफावला असुन त्यांना अनिल देशमुख घटनेची सुध्दा भिती वाटत नाही हा सर्वाच्या जिल्हयाच्या कमाई धंदा उद्यौग असुन त्यांचा विकास पसारा लग्नामधील हळदी समारंभ मैदानावरील क्रिकेट मॅची जत्रा उरूस मुरबाड फेस्टीवल अशा सर्वच कार्यक्रमात झाला आहे.त्याकडे नाईंटी,कॉटर,खंबा बियरवाल्यापासुन देशीवाला, गांवठीवाला सुध्दा मजा लुटत आहे.मात्र चार पाच बेरोजगारासाठी हजारो कुटूंबाची बर्बादी होत आहे.

   एकीकडे गांवठी दारूवर धाडी पडतात दुसरीकडे मोहाच्या फुलाना मान्यता मागतात मुरबाड शहर आणि तालुक्यात बनावट इंग्लिश दारू विक्री होते हि बाब जरा गंभीर आहे असे वाटत नसली तरी मातानगर, सोनारपाडा रस्त्यालगत मोठे-मोठे जुगाराचे क्लब अड्डे सुरू आहेत.अशा उद्यौगानी चार क्लब चालणार्याची घरे उजेडतात मात्र हजारो कुटुंब उध्दवस्त होतात अशा विकासाला प्रचंड गती निर्माण झाली आहे.

      पाकोळी खेडयापाडयात शहरात प्रत्येक कार्यक्रमात फिरते जुगार क्लब हे उद्यौग कौठुंबिक घातक असताना क्लबधारक पाकोळी चालक लाख रूपये रॉयल्टी कोणाला देतात ही चर्चेची बाब आहे.मुरबाड मध्ये अनेक उद्यौग सुरू आहेत.काहीवर राजकीय दबावापोटी संबधित यंत्रणेकडुन कारवाई होत नाही मात्र सार्याबाजुने सर्व यंत्रणेला धंदेवाले उद्यौजकाना चांगलाच उत्पनाच रोजगार मिळाला असल्याने विकासात भर पडत आहे त्यात काही घडणार्या घटना आपवाद असतील

No comments