web-ads-yml-728x90

Breaking News

MURBAD COURT BAR ROOM : मुरबाड कोर्टात महिला वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र बार रूमची व्यवस्था

 


BY : गौरव शेलार, YML NEWSमुरबाड,ठाणे

मुरबाड कोर्टात महिला वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र बार रूमची व्यवस्था करण्यात आली.महिला बारचे उदघाटन प्रसंगी मुरबाड कोर्टचे सन्माननीय न्यायाधीश सुभाषजी तारे सपत्नीक उपस्थित होते. तसेच मुरबाड बारचे अध्यक्ष संतोष झुंझारराव ,मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे व इतर सर्व वकील सहकारी व ऑफीस कर्मचारी उपस्थित होते.अनेक मान्यवरांनी महिला बारला भेट देऊन सुभेच्छा दिल्या.मुरबाड कोर्ट मध्ये महिलां वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात व प्रशासकिय बाबींचा पाठपुरावा करण्यात संतोष झुंझारराव यांचे फार मोठे योगदान आहे.गेल्या दोन तीन वर्षांपासून त्यांनी चालवलेल्या पाठपुराव्याला आज मूर्त स्वरूप आलं.या कार्यक्रमासाठी सर्व महिला वकिलांनी खूप मेहनत घेतली.

No comments