web-ads-yml-728x90

Breaking News

Maharashtra Weather update : राज्यात मान्सूनचा वेग १८ जूनपासून वाढण्याचा अंदाज, केरळात पाच वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद

 BYYML NEWSमुंबई

राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत असताना काही जिल्ह्यांत चांगला पाऊस ( Maharashtra Weather update ) झाला आहे. सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, १८ जून २०२२ पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात ( Monsoon Konkan weather today ) पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा असल्याचे भारतीय हवामान विभागाने ( Maharashtra monsoon live ) म्हटले आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली आहे. पेरणीची प्रतिक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा ( Maharashtra Monsoon Update ) मिळाला आहे. 16 जूनला नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, द.मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग,संपूर्ण तेलंगणा, द.छत्तीसगडचा काही भाग, द.ओडिशा, कोस्टल आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचे आणखी काही ( Monsoon news today Maharashtra ) भागात सरकला आहे. नैऋत्य मान्सून येत्या काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या उर्वरित ( Monsoon arrival in India ) भागांमध्ये दाखल होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागात दाखल होईल.

No comments