web-ads-yml-728x90

Breaking News

Maharashtra Monsoon Updates : मॉन्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला.. ५ दिवस जोरदार बसरणार..

 


BYYML NEWSमुंबई

आगामी पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये दाखल झाला (Maharashtra Monsoon Updates ) आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने आजपासून राज्यात येत्या 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज - भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

No comments