web-ads-yml-728x90

Breaking News

Maharashtra Monsoon Updates : येत्या २४ तासांत राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

आज राज्यातील अनेक भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उकाड्याने परेशान झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यासह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातही सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली जाऊ शकते. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.

No comments