web-ads-yml-728x90

Breaking News

Four story slabs of a building collapsed : नेरुळमध्ये इमारतीच्या चार मजल्यांचे स्लॅब एकापाठोपाठ कोसळले

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई

नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) नेरुळ ( Nerul ) परिसरातील सेक्टर 19 मधील जिमी पार्क इमारतीच्या आतील चार स्लॅब एकापाठोपाठ कोसळल्याची ( Four Slabs collapsed ) घटना घडली आहे. या इमारतीच्या आत असलेल्या 7 जखमींना बाहेर काढण्यात आहे. अद्यापही एक महिला स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती खाली करण्याच्या सूचना मुंबई पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक घरे सोडत नाहीत आणि त्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. नवी मुंबई नेरुळ परिसरातील सेक्टर 17 मधील जिमी पार्क इमारतीच्या स्लॅबला भगदाड पडल्याने एकापाठोपाठ एक-दोन नव्हे तर चार स्लॅब आतून कोसळले. सद्यस्थितीत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. आणखी एक महिला या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. तिला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या इमारतीतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे व आयुक्त अभिजीत बांगर दाखल झाले आहे. आयुक्तांनी घटनेची पाहणी केली आहे. नवी मुंबईत एका इमारतीचा सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने सात जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

No comments