web-ads-yml-728x90

Breaking News

Devendra Fadnavis On Pawar : ...हे तर पवारांच्या विरोधातील षडयंत्र - देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

 


BYYML NEWSमुंबई

काल देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले की, काल अजित पवार व पंतप्रधान इतक्या मनमोकळेपणाने बोलत होते. त्यांनी अजित पवारांची विचारपूस सुद्धा केली. एवढेच नाही तर भाषणात अजितदादांचे नाव नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः अजित पवारांना सांगितलं की तुम्ही बोला. हे सर्व काही लोकांना पाहावत नाही आहे, म्हणून इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशाप्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. मला असे वाटते की अजित पवारांच्या विरोधात हे षड्यंत्र आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपची आज एक महत्वाची बैठक भाजप प्रदेश कार्यालयांमध्ये झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महासचिव विनोद तावडे त्याचबरोबर इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये रणनीती त्याचबरोबर आढावा घेण्यास संदर्भामध्ये ही बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे.

No comments