web-ads-yml-728x90

Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि बा पाटिल हयांचे नाव देणार – मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे:

 


BYYML NEWSमुंबई

आज रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेत्यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हयांनी बैठक बोलवली . सदर बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी मराठी माणसात होणारे वाद थांबले पाहिजेत माझे आजोबा व वडील वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयांनी आपल्या हयातीत नावासाठी कधी हि आग्रह केला नाही. ज्यावेळी विमानतळाला नाव द्यायचा विषय आला त्यावेळी मी हि सुचना केली होती कि ज़र नावा बाबत वाद विवाद असेल तर तो विषय संपवा परंतु तत्काळीन मंत्री महोदयांनी मला सांगीतले कि साहेब मी जबाबदारी घेतो आणि सदर विषय मार्गी लावतो तुम्हीं काळजी करु नका. त्यानंतर ना मला प्रकल्पग्रस्त समिति भेटली ना मंत्री महोदयांनी विषय काढ़ला.मी ज़र ठरवल असत तर कधी ही मी सभागृहात विषय घेवुन मंजुर करुन नामकरण जबरदस्तीने केले असते पण मी जाणिव पुर्वक हा विषय आजतागयत सभागृहात घेतला नाही. नामांतरण विषय फक्त सिडको बैठकीत मंजुर झाला आहे. संभाजीनगर शहरासारख सभागृहात मंजुर झालेला विषय नाही त्यामुळे काळजी नसावी. आज मी तुम्हाला अश्वासित करतो कि मा. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजुठ अभेद्य रहावी म्हणुन आपली हयात घालवली त्याच शिवसेनाप्रमुखांच्या नावासाठी मी मराठी माणसात फुट पाडणार नाही विशेषताः आगरी कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर ख़ुप ऋण आहेत. त्यामुळे यापुढ़े आपण एकीने दि बा पाटिल साहेंबांच्या नावासाठी आग्रही राहु. सदर बैठकित आमदार बाळाराम पाटिल , रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटिल, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, द्वारकानाथ भोईर, मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटिल, रोहिदास पाटिल, नगरसेवक- एम के मढ़वी, सोमनाथ वास्कर , करण मढ़वी, चेतन नाईक, संजय तरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख सूर्यकांत मढ़वी, दीपक घरत , कोंग्रेस चे महेंद्र घरत, प्रकल्पग्रस्त नेते राजाराम पाटिल व मोठया संख्येने रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.

 

No comments