web-ads-yml-728x90

Breaking News

आज बारावीचा ऑनलाइन निकाल, 'इथे' पाहा तुमचे गुणपत्रक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल ( Maharashtra HSC 2022 Result ) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवारी ( दि. 8 जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेला ( Exam Fever ) सुमारे 14 लाख 85 हजार विद्यार्थी सामोरे गेले होते. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार 8 जून रोजी दुपारी 1वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्याना पाहता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

No comments