web-ads-yml-728x90

Breaking News

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना होणार वर्ग

 


BYYML NEWSमुंबई

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय (योजना) असे तर जिल्हास्तरावर ज्या ३० जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी निरंतर कार्यालय यापूर्वी अस्तित्त्वात होते, अशा ३० जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी निरंतर कार्यालयाचे नामांतर शिक्षणाधिकारी (योजना) असे करण्यात येणार असून प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.या शासन निर्णयानुसार विभागातील विविध योजना ह्या जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाकडून हाताळण्यात येतील. तसेच ३० जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाचे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले कामकाज शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे. तसेच कार्यालयाच्या जागेचा ताबा देखील शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. योजना वर्ग करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

No comments