web-ads-yml-728x90

Breaking News

धावत्या लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला आणि...

 


BY : YML NEWS ठाणे

लोकल ट्रेनच्या मोटार कोचच्या डब्याला लटकून प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाचा हात सटकला आणि तरुण खाली पडला आणि त्यात जखमी झाला आहे. ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानका दरम्यान हा प्रकार घडला आहे. या तरुणाला त्याच्या नातेवाईकाने काही प्रवाश्यांच्या मदतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज, कळवा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या या तरुणाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून हाताला आणि पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

No comments