web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या जुगार अड्डाचा परदेशी लॉटरीचा मासिक लाखोचा हप्ता कोणाला;गुप्तचर यंत्रणेला अवैध धंदयाची माहिती कशी नाही....!

 


BY - नामदेव शेलार,YML NEWS - मुरबाड,ठाणे

मुरबाड शहर तालुक्यात जुगार क्लब विदेशी दारू चोरीचा भंगार अन्य अवैध धंदे गेले अनेन् वर्षे सुरू आहेत त्यांची वसुली कोणती यंत्रणा करते त्याला लगाम घालण्यास स्थानिक आमदार खासदार मंत्री अपयशी ठरल्याची चर्चा आहे.

   मुरबाड शहरात मातानगर मध्ये दोन जुगाराचे अड्डे आहेत त्यांच्याकडुन 50 हजारापेक्षा मासिक हप्ता दिला जातो अन्य अवैध धंदयात लाखो रूपये हप्ता दिला जातो याची चर्चा सर्वत्र खुलेआम असताना वरिष्ठ संबधित अधिकारी कारवाई करत नाहीत विशेष म्हणजे गुप्तचर सिआयडी विभाग अन्न औषधे प्रशासन विभाग अन्न भेसळ विभाग स्थानिक आमदार खासदार मंत्री यांचेही दुर्लक्ष होतय अशा धंदयाना राजकीय पाठबळ कोणाचं आहे याची सर्वत्र चर्चा आहे.

  मुरबाड शहर,सरळगांव, धसई ,म्हसा, टोकावडा अशा शहरीकरणात जुगाराचे अडडे उन्हाळा पावसाळा गणपती उत्सवकाळात सुरूच असतात त्याचबरोबर पाकोळी हा धंदा आता सर्वच कार्यक्रमात सुरू झालाय क्रिकेट मॅची पासुन लग्न हळदी समारंभ अन्य कार्यक्रमात पाकोळी नावलौकीक धंदा आहे त्याचाही हजारो रूपय हप्ता दिला जातो.

 याच धंदयावाले हप्ते घेणारे यंत्रणाचे अधिकारी धंदेवाले तक्रारदार यांच्यावर सुडबुध्दीने रोष काढतात आपल्या अधिकार्याचा दहशतीचा राजकीय वरदहस्ताचा वापर करून हजारो कुटूंबाची बर्बादी करतात पत्रकारावर दबाव आणतात काही राजकरणी आपला समर्थक कार्यकर्ता म्हणुन अवैध धंदयाना प्रोत्सहान देतात हे दुदैवी आहे.

  मुरबाडच्या जुगार अडडे बदल संबधित वरिष्ठ अधिकार्याकडे स्वतंत्र संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी तक्रार केली असुन अवैध वाहातुक प्रवाशी जुगार अडडे पाकोळी बनावट दारू अन्य अवैध धंदे यावर कारवाई होणार नसेल तर सर्वसामान्याना सुध्दा परवानगी दया अशी मांगणी शासनाकडे केली आहे.परदेशी लॉटरीचा 50 हजार हप्ता कोणती यंत्रणा जमा करते याची चौकशी करून कारवाईची मांगणी सामाजिक संघटनानी केली आहे.

 

No comments