web-ads-yml-728x90

Breaking News

विद्युत वाहनांना 'अच्छे दिन'.. पालिका, बेस्टकडून चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात

 


BYYML NEWSमुंबई

राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( BMC and best bus service charging station ) यांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद ( Best bus service electric vehicles ) देत मुंबई महापालिकेसह बेस्टने त्याला प्रतिसाद देत त्याची ( Best bus service charging station in mumbai ) अंमलबजावणी सुरू केली आहे. बेस्टने इलेक्ट्रिक वाहने ( Electric bus mumbai ) घेण्यास सुरुवात केली आहे. पालिका तसेच बेस्टने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास ( Electric vehicle charging station ) सुरुवात केली आहे. या चार्जिंग स्टेशनवर आपले वाहन चार्जिंग करता येणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याने नुकतेच नवीन विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले आहे. २०२५ पर्यंत राज्यात नव्याने नोंद होणाऱ्या वाहनांपैकी १० टक्के वाहने ही विद्युत आधारीत वाहने असतील, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे. या धोरणानुसार मुंबईतील पहिले सार्वजनिक विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन दादर (पश्चिम) मधील कोहिनूर स्क्वेअर इमारत स्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनतळावर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासोबत, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी नवीन २८ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पालिकेने ही स्टेशन बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली असून पुढील सहा महिन्यात ते काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या केंद्रांकडे २५ किलोव्हॅट क्षमतेची स्टेशन असतील. सध्या एका इलेक्ट्रिक मध्यम आकाराच्या वाहनास चार्जिंगसाठी सुमारे २ तासाचा कालावधी लागतो. या चार्जिंगच्या आधारे ही वाहने १८० ते २०० किमीपर्यंत प्रवास करू शकणार आहेत.

No comments