web-ads-yml-728x90

Breaking News

साखर उद्योगासमोरील अनेक प्रश्नांवर शरद पवारांनी सांगितली त्रिसूत्री; मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवपुणे

दूरगामी दृष्टी, संकल्प आणि तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad pawar on questions facing sugar industry ) म्हणाले. वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटन ( Sugar Council 2022 ) प्रसंगी ते बोलत होते. तर या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे व दुरगामी धोरण तयार करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( CM Uddhav Thackeray in Sugar Council 2022 ) केले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे असे म्हटले आहे.

No comments