web-ads-yml-728x90

Breaking News

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज अयोध्येत.. शिवसेनेकडून जोरदार तयारी.. रामलल्लाचे घेणार दर्शन

 


BY – YML NEWSअयोध्या ( उत्तरप्रदेश )

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे श्री राम लल्लाच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी अयोध्येत पोहोचून तयारीचा आढावा घेतला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीतीरी होणाऱ्या गंगा आरतीत आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

No comments