web-ads-yml-728x90

Breaking News

वांद्रे परिसरात तीन मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर जखमी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

वांद्रे परिसरात काल रात्री १२:३० च्या सुमारास तीन मजली इमारत ( Building collapsed in Bandra area in Mumbai ) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, ४ अग्निशमन दल, पोलीस, १ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १६ जण रुग्णालयात दाखल असून सर्व सुरक्षित आहेत. हे सर्व लोक बिहारमधील मजूर आहेत. ढिगाऱ्याखाली ३ ते ४ लोक अडकल्याची शक्यता बीएमसीने व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू असल्याचे बीएमसीने सांगितले.

No comments