web-ads-yml-728x90

Breaking News

PM Modi Gujarat Visit : बापूंच्या स्वप्नांचा भारत घडवित आहोत - नरेंद्र मोदी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवअहमदाबाद  

राजकोटमधील आटकोट येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi visit Atkot Rajkot ) म्हणाले की, लोकांच्या प्रयत्नांना सरकारच्या प्रयत्नांची जोड दिली जाते, तेव्हा आपली सेवा करण्याची शक्ती वाढते. राजकोटमधील हे आधुनिक रुग्णालय ( KDP Multispecialty Hospital ) याचे प्रमुख उदाहरण आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय ( PM Modi on India development ) आहे. बापूंच्या स्वप्नांचा भारत घडविण्याचा प्रयत्न केला. आम्ही 8 वर्षे देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. देशसेवेत कोणतीही कसर सोडली नाही. आज गरीबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. 6 कोटी कुटुंबांना नळातून पाणी ( Water for 6 crore families ) देण्यात आले. सुशासन आणि गरीबांचे कल्याण हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाला मोफत लस ( Free vaccine by gov ) देण्यात आली. आज प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळत आहे.

No comments