Murbad Police | व्यापारी वर्गाने मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी सिक्युरिटी गार्ड नेमावे धडाकेबाज पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांचे आवाहन
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे
शहरात मागील काही महिन्यापुर्वी चोर्यांचा सुळसुळाट सुरू झाला होता याला आळा घालण्याची जबाबदारी मुरबाडचे धडाकेबाज नवतरून जवानांचे मार्गदर्शक पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे (Murbad Police) यांच्यावर होती.आपल्या अनुभवाने मुरबाड शहरात रात्रीची रिंगराऊंड पेट्रोलिंग सुरू करून चोर्या मार्या व विविध अवैध धंदे यावर आळा घातल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.मात्र चोरटे आपल्या क्राईम युक्तीचा वापर करून व्यापार्यांच्या मालमत्तेची नुकसान करू शकतात हे पोलिस निरिक्षक पांढरे यांच्या लक्षात आले. शहरातील बाजारपेठेतील व्यापारी सोसायटी अध्यक्ष व पदाधिकारी बँक अधिकारी सोन्या चांदीचे मालक मोबाईल व्यापारी यांची मुरबाड पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक घेतली.मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आमची पोलिस टिम काम करतील व आपणही सिक्युरिटी गार्ड नेमावेत जेणे करून मुरबाड शहर व्यापारी वर्ग हा निश्वास सोडेल असे आवाहन पोलिस निरिक्षक प्रसांद पांढरे यांनी केले.
No comments