web-ads-yml-728x90

Breaking News

Fadnavis Vs Uddhav : तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही- देवेंद्र फडणवीस

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही असे आव्हाण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. संभाजी राजांचा खून करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी वर जाऊन तो ओवेसी नतमस्तक होतो त्याला हे सरकार पाठीशी घालत आहे. आम्ही तलवार म्यान केली नाही आम्ही ठाम पणे मुकाबला करु. मुंबईकरांना मराठी समजते. पण एक मुंबईकर असा आहे जो आहे मुंबई ची वाट लावत आहे म्हणून मी मराठीत बोलणार म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. सब ठीक बा ना?.... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषी महासंकल्प सभेच्या भाषणाला सुरुवात केली. या सभेत फडवणीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेचा भरपूर समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची कालची सभा 'मास्टर' सभा नाही, तर 'लाफ्टर' सभा होती. काल काही तेजस्वी, ओजस्वी एकायला भेटेल असे मला वाटले होते. पण लाफ्टर शो शेवट पर्यंत संपला नाही, ते म्हणाले होते 100 सभांची एकच सभा 100 कौरव असतात त्यामुळे काल कौरवांची सभा झाली आज पांडवाची सभा आहे.सामूहिक वाचण करण्यात आले, त्यावर बोलताना फडवणीस म्हणाले, ' राम दुवारे तुम रखवारे, होत ना आज्ञा बिन पैसा रे', इतकीच हनुमान चालीसा उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारला माहित आहे. तसेच संभाजी राजांचा खून करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी वर जाऊन तो ओवेसी नतमस्तक होतो त्याला हे सरकार पाठीशी घालत आहे. आम्ही तलवार म्यान केली नाही आम्ही मुकाबला ठामपणे करु असेही फडणवीस म्हणाले.

No comments