web-ads-yml-728x90

Breaking News

Electric Vehicles : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला उतरती कळा; ३० टक्क्यांनी खरेदीत घट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

वाढत्या इंधनदरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी (Electronic Vehicles Purchase) करण्याचा नागरिकांनाच कल वाढला होता. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांना आगीचा घटना, रशिया व युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि चीनमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown in China) फटका आता वाहन विक्रीवर दिसू लागला आहे. राज्यात एप्रिल महिन्यात मार्चच्या तुलनेत ३० टक्क्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी घट झाली आहे. त्यामुळे वाहन निर्मिती कंपन्या अडचणीत सापडले आहे.

एप्रिल महिन्यात खरेदीत घट - गेल्या काही वर्षात सतत इंधनदरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या फटका बसला आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईची झळ सोसावी लागू नयेत म्हणून अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. मात्र, रशिया व युक्रेन युद्धासह चीनमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम वाहन उत्पादनावर झाला आहे. त्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांचा अहवाल संबंधित कंपन्यांकडून मागवला आहे. तोपर्यंत नवी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करू नयेत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यांचा परिणामी, इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात जानेवारी महिन्यात ५ हजार ७४७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. त्यात फेब्रुवारीमध्ये ८ हजार २०८ आणि मार्चमध्ये १२ हजार २०१ वाहनांपर्यंत वाढ झाली होती. मात्र, गेल्या महिन्याभरात झालेल्या घडामोडींमुळे एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांचा खप ८ हजार १८७ इतका कमी झाला आहे.

No comments