web-ads-yml-728x90

Breaking News

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेसन दिल्ली भारत यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पदनियुक्ती सन्मान गौरव पुरस्कार व रक्तदान शिबीर संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव नाशिक

नाशिक येथे दिनांक 24 04 2022 रोजी जेष्ठ नागरिक हॉल भारतनगर या ठिकाणी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेसन दिल्ली भारत यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पदनियुक्ती सन्मान गौरव पुरस्कार रक्तदान शिबीराचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रात अनेक नविन पदाधिकारी यांची नेमणुक करण्यात उत्तम कामगिरी करणार्या पदाधिकारी यांच्या फेडरेशनच्या वतीने समाजसेवा सन्मानरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


 

   या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन विशेष सरकारी वकील महाराष्ट्र हायकोर्ट मा.शिशीर हिरे ,ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, ग्रामीण जिल्हा उपअधिक्षक राजेंद्र टेंभेकर, राष्ट्रीय सल्लागार गजानन ठाकरे ,महाराष्ट्र प्रभारी .. वाल्मीकी महाराज जाधव ,आडगाव पोलिस निरिक्षक इरफान शेख ,उपनिरिक्षक गोरख शिरसाठ हे उपस्थित होते.फेडरेशनच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणुन डॉ.वसंतराव पवार वैदयकिय संस्थेच्या माध्यमातुन रक्तदान शिबीर आयोजित करून 40 बाटल्या रक्त गोरगरीब लोकांसाठी जमा करण्यात आले.सदर शिबीरात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर ,संजय तेलवणे, ज्ञानेश्वर मुकादाम यांनी प्रथम रक्तदान करून वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे उदघाटन केले.सदर कार्यक्रमात डॉ.वसंतराव पवार वैदकीय महाविदयालया तर्फे जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचा सन्मानपत्र ट्रॉफी रक्तदाते यांचा प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.सदर मेळाव्यात कार्यकारी सचिव राम घरत संजय तेलवणे यांना पदोन्नती करून महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र सचिव या पदावर नियुक्त करण्यात आले.तसेच अविनाश म्हात्रे यांची महाराष्ट्र मिडीया सेलचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.सदर कार्यक्रमात फेडरेशनचा विविध उपक्रमाची माहिती पुढील घ्येय धोरणे ठरविण्याबाबत चर्चा झाली.

No comments