web-ads-yml-728x90

Breaking News

रस्त्यावरच्या टपर्‍या तोडुन कारखाण्याचा अनाधिकृत बांधकामे सेटलमेन्टने वाचवणार्‍या एमआयडीसी अधिकार्‍याना कोणाचा पाठिंबा.......!

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड एमआयडीसी मधील कारखाण्यात काय बनतयं कोणाच्या नावावर कारखाने कोण भंगार विक्रेते कोण सीएसआर फंड लाटतोय कोण कामगाराचा पीएफ विमा आरोग्य विमा लाटतोय कोण अवैध बांधकामे हप्ते घेतो कोण कर जीएसटी चुकवतोय कोण पाण्याचा पैसा लाटतोय कोण भुखंड प्लॉट लाटतोय कोण हॉलचा भाडा खातोय कोणाच्या नावावर किती प्लॉट त्यात त्याचा व्यवसाय काय या सर्वाना आर्शिवाद कोणाचा स्थानिक लोकप्रतिनिधीचा की सरकारचा त्यांच्यावर कारवार्इ राज्य सरकार करणार की केंन्द्र सरकार जर दोघेही सत्ताधारी आहेत मग अशा भ्रष्टाचाराकडे भाजपा पोलखोल अभियानात सामील करणार का? असा प्रश् नागरिकाना पडलाय…!

   स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी एमआयडीसी मधील अवैध बांधकामे विविध वरील घोटाळया संदर्भात तक्रार केली आहे.त्याची चौकशी मुख्यमंञ्यानी करण्याचे आदेश दिले आहेत.परंन्तु राज्याचे औद्यौगिक मंत्री शिवसेनेचा आहे.आणि मुरबाड मध्ये भाजपाचा आमदार खासदार केंन्द्रीय मंत्री आहेत त्यामुळे कारवाई कुठपर्यंत वेग घेते यांची वाटपाहुन स्वतंत्र संपादक पत्रकार संघ न्यायालयात न्याय मागेल असी भुमिका स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा स्वतंत्र श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष चाळके यांनी घेतली आहे.

  जेथे राजकारणी सत्ताधारी आणि प्रशासकीय भ्रष्टाचारी मनमानी मुजोरपणात जनतेला तक्रारदाराला न्याय मिळणार नाही त्यांनी न्यायालयात न्याय मागावा जरूर न्याय मिळतोय असे सांगुन मुरबाडच्या एमआयडीसीत रस्त्यावरील टपर्या तोडुन प्लॉटधारक कारखानदारानी केलेली अतिक्रमणे तोडली जात नाहीत त्यांच्याकडुन हप्ते बाजी वसुल केली जाते की सेटलमेन्ट याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

एमआयडीसी मध्ये कारखाणदाराची चौकशी का होत नाही जेव्हा कारखाण्याला आग लागली  होती तेव्हा फायर ब्रिगेड मुद्दा समोर आला होता कारवाईचे आदेश दिले होते परंन्तु आजही अनेक प्लॉट धारक कारखानेदारानी वाढीव बांधकामे केली आहेत एका प्लॉटमध्ये अनेक व्यवसाय सुरू आहेत अनेक तक्रारीचे निवेदन स्वतंत्र संपादक पत्रकार संघानी दिला आहे यापुढे येथील कामगाराना मिळणारे कीमान वेतन ठेकेदारी कामगाराना मिळणारे सुविधा आरोग्य विमा उपौचार कामगारांच्या ठेकेदाराच्या नोंदणी याची चौकशी केंन्द्र सरकारने करावी यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहेत.

  मुरबाड मधील कारखाण्याचा भंगार कुठे जातो कोण घेतो याचीही चौकशी होणे गरजेचे आहे कोव्हीड कालावधीत कारखाण्यानी कोव्हीड सेन्टरला काय मदत केली सीएसआर फंडाची मदत झाली काय ? ऑक्सीजन गॅसची मदत झाली काय ? नगरपंचायतीला झाडे लावण्यासाठी निधी दिला होता काय ? मग ती झाडे जगलीत काय ? असे अनेक प्रश् निर्माण झाले असुन कोणाकोणाचे अतिक्रमण आहे त्यांची यादी तक्रारीत देण्यात आली असुन ग्रामीण भागात कारखाने गोडावुन साठी तहसिलदार औद्यौगिक वसाहतीने परवानग्या दिल्यात काय? याचीही शासनाने चौकशी करावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघानी केली असुन औद्यौगिक वसाहतीचे हॉल कुठे आहे कोण चालवतयं याचीही चौकशी करण्याची मांगणी केली आहे.

   पावसाळयापुर्वी नालासफाई झाली कींवा नाही त्यापेक्षा नाल्यावर असणारी बांधकामे तोडलीजात नाहीत त्याचा फटका पुरहाणीला बसणार असुन सार्वजनिक वाहातुक म्हसारोड येथे बंद होणार आहे त्याकडेही लक्ष दयावे

No comments