web-ads-yml-728x90

Breaking News

अपंग मुलीच्या मदतीसाठी धावला सोनू सूद

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अभिनेता सोनू सूद बिहार राज्यातील जमुईच्या सीमाला मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. ही मुलगी एका पायावर लंगडत शाळेला जात होती. तिचा व्हिडिओ पाहून सोनूने ट्विट केले व लिहिले, ''आता ती एका पायावर नाही तर दोन्ही पायावर उडी मारत शाळेत जाईल. मी तिकीट पाठवत आहे, दोन्ही पायांवर चालण्याची वेळ आली आहे.'' बिहारमधील दमुई गावातील सीमा ही विद्यार्थीनी चौथ्या इयत्तेत शिकते. सीमा एका पायाने अपंग असून ती शाळेत दररोज एका पायावर उडी मारत जात असते. सोशल मीडियावर 10 वर्षीय मुलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोनू सूद तिच्या मदतीसाठी पुढे आला. तत्काळ मदतीची घोषणाही केली. दोन वर्षांपूर्वी सीमा हिला फतेहपूर गावातच ट्रॅक्टरने धडक दिली होती, ज्यामध्ये तिच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली होती. जीव वाचवण्यासाठी एक पाय कापावा लागला. दोन वर्षांपासून सीमा एका पायाने जगण्याची सवय करत आहे. पण आता तिचे लंगडत चालण्याचे दिवस संपले आहेत.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार प्रशासनाला जाग आली आहे. तातडीने सीमाच्या मदतीसाठी त्यांनी तीन चाकी सायकल देऊ केली आहे. डीएम अवनिश सिंह यांनी सीमा हिला ट्राइसिकल सोपवली आहे.

No comments