web-ads-yml-728x90

Breaking News

हरियाणातून दहशतवादी शस्त्रसाठ्यासह ताब्यात, नांदेडमधील धुमाकुळीचा उधळला डाव

 


कर्नाल - हरियाणा पोलिस आणि आयबी यांच्या संयुक्त करावाईत चार जणांना ( Karnal Police detains four terror suspects ) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात काडतूस आणि दारूगोळ्याने भरलेले कंटेनर जप्त करण्यात आले आहे. चारही संशयितांना सध्या कर्नालमधील मधुबन पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले असून तिथे त्यांची कसून चौकशी सुरु आहे. हे चारही संशयित नांदेडला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसही सतर्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले स्फोटक आरडीएक्स असू शकतात. अशा परिस्थितीत संशयित दहशतवाद्यांकडून पकडलेल्या स्फोटकांच्या तपासासाठी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. (Terrorists Arrested In Karnal ) त्याचबरोबर हे स्फोटक संशयित दहशतवाद्यांच्या वाहनाजवळून ऑटोमॅटिक ग्रोअरद्वारे काढले जाणार आहेत. मधुबन पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलीस हे स्फोटक डिस्चार्ज करण्याची क्षमता तपासण्यासाठी सतत तयारी करत आहेत. पोलीस ठाण्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

No comments