web-ads-yml-728x90

Breaking News

शेततळ्यांवर सौरक्षक कुंपण बसवा,मुलांचा जिव वाचवा


BY : YML NEWS - अहमदनगर

 शेतातील शेततळ्यांवर सौरक्षक कुंपण सक्तीने बसविने बाबत शासनाने लवकरात लवकर शासन परीपत्रक काढावे असे निवेदन भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधीकारी साहेब  यांना देण्यात आले.जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी ब-याच शेतकरी बंधुंनी शेतात खाजगी/अनुदानीत शेततळे खोदुन बांधून घेतलेले आहे.त्यात पाणी साठवुन आपल्या पिकाचे पालन पोषन करत आहेत.परंतु  ह्या शेततळ्यांवर कुठल्याही प्रकारचे सौरक्षण कुंपण नाही त्या मुळे लहाण मुले त्यात पोहायला उतरुन बुडत आहेत.आतील निमुळता गुळगूळीत भाग व प्लॅस्टीक चा कागद हा अतीशय गुळगूळीत झालेला असतो त्यात पडलेलीे लहाण मुलं जिवंत बाहेर येत नाहीत ति बुडून मरण पावतात. त्यामुळे ह्या सर्व तळ्यांवर त्वरीत सौरंक्षण कुंपण बाधण्यास सक्ती करावी तसे शासन परीपत्रक काढावे व त्याची सर्वत्र अंमलबजावनी व्हावी व मुलांचा जिव वाचवावा. लहाण मुले हि देशाची धरोहर असुन उद्याचे नागरीक आहेत मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे.त्यांचा जिव वाचवणे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.अशे विनंती निवेदन देण्यात आले.निवेदनावर राज्याचे उपाध्यक्ष सुनिल ऊमाप,जिल्हाध्यक्ष सुनिल सकट, तालुकाध्यक्ष गणेश ढोबळे,शहराध्यक्ष अशोक भोसले, शहरउपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या सह्या आहेत.

No comments