web-ads-yml-728x90

Breaking News

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुंबईतील वरळी सी-फेस येथे  कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित केलेल्या  सचित्र प्रदर्शनास आज अनेक नागरिकांनी  भेट दिली. हे सरकार सर्वांना न्याय देणारं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आम्हाला गर्व आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण शेवाळे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन व्यक्त केली. तसेच शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती जाणून घेतली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमार्फत शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे !’,अशा प्रतिक्रिया  दिल्या.प्रदर्शनस्थळी  उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे  कॉमन मॅन पुतळा परिसरात हे प्रदर्शन दि. १ ते ५ मे या कालावधीत सर्वसामान्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

 

No comments