web-ads-yml-728x90

Breaking News

अंबरनाथमध्ये धरणाच्या भूसंपादनात घोटाळा, खोटे लाभार्थी दाखवून कोट्यवधी लाटले, ३० जणांना बेड्या

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अंबरनाथ

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात धरणासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खऱ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवत खोटे लाभार्थी उभे करून जमिनींचा कोट्यवधी रुपयांचा मोबदला परस्पर लाटण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ४ गुन्हे दाखल करत जवळपास ३० जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यातील मौजे कुशीवली गावात लघुपाटबंधारे विभागाकडून धरण उभारण्यात येणार आहे. 'कुशीवली लघुपाटबंधारे योजना', असं या प्रकल्पाचं नाव असून यामध्ये धरणाचा पाया आणि बुडीत क्षेत्रासाठी स्थानिक शेतकऱ्यांची एकूण २१२.५ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी महसूल विभागाकडून भूसंपादन करून लाभार्थ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत आत्तापर्यंत १३० एकर जमीन संपादित करण्यात आली असून ८२.५ एकर भूसंपादन अद्याप बाकी आहे.

No comments