web-ads-yml-728x90

Breaking News

वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवे!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.

No comments