सिंदखेड राजा विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बुलडाणा
राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला सिंदखेड राजा चा विकास करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र हा विकास करताना स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेऊन विकास आराखडा करावा. येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र जी कामे होतील ती उत्कृष्ट दर्जाची व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृहात सिंदखेड राजा विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अॅड नाझेर काझी आदी उपस्थित होते.
No comments