web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण मधील सनशाईन मोबाईल रिपेरिग इन्स्टिटय़ूटच्या हजारो विदयार्थ्यांना मिळाला रोजगाराचा लाभ ठाणे जिल्ह्यात कौतुक....!


BY : गौरव शेलार , YML NEWS - कल्याण

 महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे. सर्व वस्तू चे दर गगनाला भिडले आहेत .त्यात  मोबाइल चे दर सुद्धा वाढले आहेत मात्र मोबाईल आजच्या युगात एक आधुनिक टेकनॉलोजी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. मोबाइलच्या वाढत्या बाजारपेठेमुळे मोबाइल दुरुस्तीचा व्यवसाय वाढत असून त्यामुळे हजारो युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे.

मोबाइल दुरुस्तीतून अनेकांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. दहावी-बारावीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी स्वत:ची मोबाइल दुरुस्तीची दुकाने थाटली आहेत. या व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेऊन सनशाईन इन्स्टिटय़ूट कल्याण चे अजय सिरोज यांनी मोबाइलचा दुरुस्ती प्रशिक्षण संस्था उदयास आणली  आहे. अँड्रॉइड, विंडोज, टॅब तंत्रज्ञान असलेल्या मोबाइलची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या व्यवस्थित वापराची माहिती नसल्याने हार्डवेयर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारी दूर करण्याची सुविधा आता कल्याण शहरात उपलब्ध आहे.  कल्याण मधील सनशाईन इन्स्टिटय़ूट मध्ये  मोबाइल दुरुस्ती प्रशिक्षणासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. प्रशिक्षणात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, तसेच सुट्या भागांची तपासणी व संगणकीय कार्यपद्धती शिकवली जाते. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्यातील बाजारपेठेत अवघ्या काही हजारांत हा व्यवसाय सुरू करता येतो. मोबाइल दुरुस्तीसोबतच अँक्सेसरीज (स्पिकर, हेडफोन, हँगर, सीमकार्ड, मेमरी कार्ड) विक्रीसाठी ठेवल्यास उत्पन्नात वाढ होते.कल्याण शहरात जवळपास सगळ्या मोबाइल कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर आहेत. कंपनीकडे मोबाइल दुरुस्तीसाठी टाकला, तर 15 दिवस लागतील, असे सांगितले जाते. मात्र, खासगी तंत्रज्ञाकडे दुरुस्ती अवघ्या काही तासांत होते. याच सन शाईन इन्स्टिटय़ूट चे कल्याण डोंबिवली मध्ये शाखा असून संस्थे मार्फत कमी फीस मध्ये मुलांना याचा लाभ मिळत आहे. आज तयागत हजारो विद्यार्त्यांना चांगल्या प्रकारे मोबाईल रिपेअरीग शिक्षण अजय सिरोज यांनी दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments