web-ads-yml-728x90

Breaking News

सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाची चौकशी करून मान्यता रद्द करण्यासाठी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे दिल्ली शिक्षणमंत्री,महाराष्ट्र सरकारला निवेदन... आमरण उपोषणाच्या इशाराची दखल केंद्रिय व महाराष्ट्र सरकारनी घेऊन लावली चौकशी


BY : YML NEWS -पनवेल

पनवेल तालुक्यातील शेंडूग जवळ सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय आहे. या महाविद्दयालयात काही महिण्यांपूर्वी इंजिनिअर विभागात विद्दयार्थ्यांच्या फी संदर्भात विषय झाले होते.तशाच फी व विद्दयार्थ्यांची लयलूट ही विधी क्षेत्रातील विद्दयार्थ्यांची केली असल्याचे काही कागदोपत्राचे अवलोकन करता समोर आली आहे. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयात वकिली क्षेत्रातील श्क्षिणासाठी विद्दयार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे सदरहू प्रवेश घेतांना सी.ई.टी देऊन या महाविद्दयालयाची संपूर्ण माहिती तथा फी आकारणी गुगल मधील मुंबई विद्दयापीठांतर्गत असणारे विधी क्षेत्रातील माहिती ही पाहून विद्दयार्थ्यांनी प्रवेश घेतला होता यावेळी वकीली क्षेत्राची 3 वर्षाची फी 1 लाख 20 हजार इतकी ऑनलाईनवर दाखविली असता प्रत्यक्षात प्रत्येक विद्दयार्थ्यांकडून प्रवेश करतांना 46 हजार 100 रूपये इतकी आकारणी केली आहेत्यामध्ये प्रॉस्पेक्शनचे 600 रूपये,फी 45 हजार रूपये,कॉऊशन फी 200 रूपये तर ओळखपत्राचे 300 रूपये असे वेगवेगळया स्वरूपात फी आकारणी केली असून गुगल वर दाखविले एक आणि निघाले दुसरे अशामुळे विद्दयार्थ्यांची फसवणूक ही करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.ऑनलार्इनवर एल.एल.बी पद्वीधारकांच्या पात्रतेतून 40 हजार  फी रक्कम भरणा दाखविले असताना बी.एल.एस ची फी एल.एल.बी विद्दयार्थ्यांच्या माथी मारली आहे. या महाविद्दयालयात विविध स्वरूपातील कार्यक्रमाचे निमित्त साधत पैसे वसुली करून विद्दयार्थ्यांना सक्ती करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत मानव संसाधन विकास मंत्रालय,भारत सरकार यांचेकडील दि 28 मार्च 2020 रोजीचे पत्र काढण्यात आले त्यामध्ये फी कपात करण्याच्या सुचना नवी दिल्ली येथून महाराष्ट्रातील सर्व विद्दयापीठा तसेच सर्व प्राचार्य,महाविद्दयालयांना,राज्य सरकारला देण्यात आले असता सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयानी मात्र त्यांचे आदेश आणि सुचनेला धाब्यावर मारून फी मध्ये वाढ केली त्यामुळे कोरोना कालावधीचा डाव साधून महाविद्दयालय आपली तिजोरी भरतच होता त्यामुळे सक्ती आणि विद्दयार्थ्यांना सक्ती ही कायमच राहिली असून या महाविद्दयालयाचे सचिव मात्र या प्रकाराकडे लक्ष न वेधता कानाडोळा करित असून लयलूटीचे पाठिराखे तर नाही ना अशी शंका वाटू लागली आहे.काही विचारणा केली असल्यास उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहे.सन 2021 सालातील तारिख संपलेले विधि क्षेत्राचे ओळखपत्र सन 2022 सालात देऊन महाप्रताप कारनामा करून विद्दयार्थ्यांची दिशाभूल केली आहे.त्याचबरोबर काही विद्दयार्थ्यांची स्कॉलरशिप गेल्या 2 वर्षापासून विद्दयार्थ्यांना महाविद्दयालयाने परत न केल्याने या स्कॉरलशिपमध्ये ही भोंगाळ कारनामा करून मोठया प्रमाणात घोळ केला असल्याचा संशय आहे.मागिल सालात मुंबई विद्दयापीठाच्या नावाखाली फी पुर्ण न भरल्यास एका दिवसाचे 25 रूपये आकारणी करण्यात येईल अशी सक्ती केली त्यातून काही विद्दयार्थ्यांकडून बेकायदेशीर वसुली झाली,त्याबाबत निर्भिड लेखणीच्या माध्यमातून याच महाविद्दयालयाच्या प्राचार्यांना पत्रव्यवहार ईमल द्वारे करण्यात आले व सर्व संदर्भ नमूद करून जर मुंबई विद्दयापीठानी अशा सुचना दिल्या असतील तर त्यांचे आदेश/सुचना यांची एक प्रत द्दयावे तसे सुचना मिळाले नसल्यास 4 ओळीचे लेखी उत्तर देऊन हो किंवा नाही असे प्रथम पत्र व स्मरण पत्रान्वये कळवून माहिती मागितली होती परंतु माहिती दिल्यास महाविद्दयालयाचे पितळ उघडं पडेल या भितीने पत्राची दखल घेतली नाही.विद्दयार्थी नापास करतील या भितीने कधी महाविद्दयालयाकडे आपली व्यथा मांडण्यासाठी गेले नाहीत परंतु चहाच्या कट्टयावर त्यांच्या मनातील रोष आणि त्यांच्या महाविद्दयालयाबद्दल असणारी बाजू पाहता हे महाविद्दयालय लयलूटीचे आहेत असे समजून आले.वकीली क्षेत्रात आम्ही विद्दयार्थ्यांना शिकवत असून आम्हाला सर्व माहिती आहे,आम्ही तयार आहोत असे चॅलेंज देणारे लवकरच खाली येतील तेव्हा कोणाचे पाय पाण्यात आहे हे दिसून येतीलच.आमची ओळख मोठी आहे असे सांगणार्‍यांचीच चौकशी लागली आहे त्यामुळे सरकार पारदर्शक आहे हे सिध्द करून दाखविले आहे.आता त्यांची ओळख त्यांनी दाखवावी ज्यांनी आम्हास चॅलेंज दिला.आम्ही देखील त्यांचे चॅलेंज स्विकारतो आणि चौथ्या स्तंभाची लेखणी ताकद,ओळख आता त्यांना आमच्याकडून दिसेल असे स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेने जाहिर आवाहनच दिले आहे.

ज्या ज्या माध्यमातून फी वाढीव,शासकीय सुचनांचे पालन न करणे,मनमानी,पत्राची दखल न घेणे व विद्दयार्थ्यांना सक्ती करून महाविद्दयालायाची तिजोरी भरणे,स्कॉलरशिपमधील घोळ अशा गलथान,भोंगाळ आणि लुटमारी व्यवसायी पध्दत संपुष्टात यावी याकरिता स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत या संघटनेने थेट दिल्ली येथिल शिक्षणमंत्री,महाराष्ट्र सरकार यांना निवेदन देऊन या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाची चौकशी करून मान्यता रद्द करावी तसे न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा या संघाच्या वतीने देण्यात आला होता या निवेदन आमरण उपोषणाची दखल तात्काळ घेऊन सदरहू महाराष्ट्र सरकार यांना निवेदन पाठवून आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करण्याबाबत कळविले आहे तसेच महाराष्ट्र सरकार यांनीही पारदर्शकपणे या निवेदनाची दखल घेतली असून या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाची चौकशी लावण्यात आली आहे त्यामुळे स्वतंत्र संपादक पत्रकार संघटना जोपर्यंत या महाविद्दयलयाची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणातून माघार नाही आणि हे आमरण उपोषण थेट मंत्रालयाच्या दालनासमोर करण्यात येणार असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.या उपोषणात पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध संघटना सामील होणार असल्याचे सुत्रांकडून कळून आले आहे.

No comments