web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याणमध्ये १ कोटीची रोकड आणि सोन्याची बिस्किटे जप्त

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवकल्याण

नांदेडहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक कोटी एक लाख ५५ हजार रुपयांची रोकड, तर नऊ लाख १४ हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे हस्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफला याविषयी माहिती मिळाली होती. त्याआधारे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा रचून ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती कुरिअर कंपनीसाठी काम करत असून, कुरिअर पोहोचविण्यासाठी मुंबईत आल्याचे त्यांनी सांगितले. तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याची तस्करीमागील रहस्याचा पोलिस आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध सुरू आहे

No comments