web-ads-yml-728x90

Breaking News

BJP FIR Against Deepali Sayyad : दीपाली सय्यद यांच्या विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ( Offensive statement against the Prime Minister ) त्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे. जर केतकी चितळेवर पोलीस कारवाई करू शकतात, तर दीपाली सय्यद यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल करीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या दिव्या ढोले म्हणाल्या की, दीपाली सय्यदसारख्या महिला प्रसिद्धी मिळाविण्यासाठी मोठ्या व्यक्तीची नावे घेऊन अशी वक्तव्ये करतात. दीपाली सय्यद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी आणि कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून देशात त्यांच्या विरोधात एक मजबूत संदेश जाईल. दीपाली सय्यद यांच्याविरोधात उद्यापर्यंत एफआयआर दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

No comments