web-ads-yml-728x90

Breaking News

मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. तसेच, परब यांच्यावर ईडीने गुन्हाही दाखल केला आहे अशीही माहिती समोर आली आहे. आज गुरुवार (दि. 26 मे)रोजी सकाळी पहाटे पासूनच ही छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी परब यांच्या शासकीय निवास्थानीही छापेमारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी येथे छापेमारी सुरू असून अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान असलेले मंत्रालयासमोर बंगल्यात देखील ईडीचे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे या बंगल्यात अनिल परब देखील उपस्थित असल्याने आज ईडीकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.

No comments