web-ads-yml-728x90

Breaking News

12 दिवसांच्या तुरुंगवासानंतर राणा दाम्पत्याला दिलासा; मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला ( Rana Couple Grant Bail ) दिलासा दिला आहे. न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणांना जामीन मंजूर ( Rana Couple Grant Bail by mumbai sessions court ) केला आहे. 23 एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने म्हटले आहे, की पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करणार नाही आणि या विषयावर माध्यमांशी न बोलण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला जात आहे. दरम्यान अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी जिंदाबादच्या घोषणा देत जल्लोष केला आहे. 'या' अटीवर राणा दाम्पत्यांना जामीन - राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अटी शर्तींसह या पती-पत्नींना जामीन मजूंर झाला असून 12 व्या दिवशी त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना काही अटी व शर्ती वर जामीन दिला आहे. त्यात प्रमुख्याने प्रसारमाध्यमांशी राणा दाम्पत्यांना संवाद साधता येणार नाही. प्रत्येकाला 50 हजारांची रोख जामीन आणि तेवढंच किंमतीच्या एक जामीनदार द्यावा लागणार आहे.

No comments