web-ads-yml-728x90

Breaking News

Phone Taping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशन कडून किल्ला कोर्टात 700 पानांची आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या चार्जशीटमध्ये जवळपास 20 शासकीय अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लाने शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दुसऱ्या नावाने फोन टायपिंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिल्यानंतर न्यायालयाने ठरवून दिलेल्या दिवसानुसार कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये येऊन जबाब नोंदवला होता. या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे.

No comments