web-ads-yml-728x90

Breaking News

पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे.ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, हे उपस्थिती राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना या सारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

No comments