मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत कामाची गुणवत्ता व दर्जा राखून वेळेत कामे पूर्ण करावी – जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे पूर्ण करताना कामाची गुणवत्ता, दर्जा सांभाळूनच कामे वेळेवर पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मृद व जलसंधारण विभागामार्फत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर मंडळांतर्गत सर्व जिल्ह्यातील मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम, राज्यस्तर योजना, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत 0 ते 600 हेक्टर सिंचनक्षमतेच्या सर्व योजनांचा आढावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी या विभागाचे सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्यासह विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments