web-ads-yml-728x90

Breaking News

लाखो रूपयांचे एअर कंडीशनरची चोरी करणार्‍या गुन्हेगारांच्या पडघा पोलिस ठाणे,स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवभिवंडी ,ठाणे

दिनांक 12 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 रोजी फिर्यादी रेहमान शेख नामक यांनी आपल्या कंटेनरचा शॉप्ट जॉईंट तुटल्यामुळे तो कल्याण तळवली रोडवर तळवली पोलिस चौकी जवळ उभा करून ठेवला असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदर कंटनेरचे सिल तोडुन त्यातील 12,55,072 रूपये किंमतीचे कॅलव्हीनेटर कंपनीचे 54 युनीट इनडोअर व आऊटडोअर सेट तसेच 22 नग इनडोअर युनिट असे चोरून नेल्याबाबतची तक्रार पडघा पोलिस ठाणे येथे भादविसंक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

  सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन पोलिस अधिक्षिक विक्रम देशमाने ठाणे ग्रामीण तसेच अप्पर पोलिस अधिक्षक ठाणे ग्रामीण स्मिता पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासठी पडघा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांचा पथक सज्ज केले वरिष्ठ पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे सुरेश मनोरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले सदर पथकाने घटनास्थळाजवळील सिसिटीव्ही फुटेज पाहुन गुन्हयात माल चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे चालकांकडे चौकशी तपास केला असता त्या वाहनानी माल भिवंडी येथील खोणी गावातील बंद गोडावुन मध्ये आरोपीनी नेला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर गोडावुन येथे छापा टाकला असता आरोपीतानी सदर ठिकाणाहुन माल त्या जागुन हलवीला असल्याचे दिसुन आले सदर गुन्हयाचा शिताफीने तपास करून सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण व पडघा पोलिस ठाण्याच्या पथकांनी उघडकीस आणला.

          सदरील गुन्हयात तीन आरोपीताना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला.गुन्हयातील आरोपी 1) सद्दाम अबरार खान वय 26 रा.उदा मशीज जवळ,भिवंडी (2) यासीन मुजममील अन्सारी वय 21 रा.शास्त्रीनगर कल्याणरोड,भिवंडी (3) आतीक शमीम शेख वय 20 वर्षे रा.कल्याणरोड,भिवंडी यांच्याकडुन 12,55,072 रूपये किंमतीचा असा 100 टक्के माल हस्तगत केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपासासाठी आरोपींना पडघा पोलिस ठाण्याचे ताब्यात सोपवण्यात आले आहे.सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरिक्षक भास्कर जाधव, राजकुमार पोवार, .पो.उप.निरिक्षक अनिल वेल्हे ,पो.हवा प्रकाश साईल ,संतोष सुर्वे ,महादेव खोमणे ,रविंद्र चौधरी, सुनिल कदम ,पो.ना.हनुमंत गायकर ,ठाकरे, गणेश पाटील ,देशमुख, रेवि भालेराव, दिपक गायकवाड, पो.शि.स्वप्नील बोडके यांच्या पथकांने उघडकीस आणलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पडघा पोलिस ठाणे करीत आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने संबधित पोलिस पथकाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

No comments