पडघ्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी जयंती साठी पडघ्यात अनेक गावे एकत्र
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी ,ठाणे
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मोठ्या उत्साहाने पडघा केंद्रावर साजरी करण्यात आली. यावेळी पडघे जिल्हा परीषद मराठी शाळेच्या आवरात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमांना पडघा विभागातील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, पडघा पोलिस स्टेशन, पडघा विभागातीलग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , सदस्य,पोलिस पाटील तर आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेली सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांना क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी सायंकाळी समतानगर येथून भव्य मिरवणुकीत काढण्यात आली होती. त्यात पडघा विभागातील विविध क्षेत्रातील नागरिक सामिल झाले होते. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभागातील तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
No comments