web-ads-yml-728x90

Breaking News

मध्य प्रदेश इंदोर येथे हिंद मराठा महासंघाचा सर्व क्षेत्रातील दिग्गज मराठा यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव इंदोर

हिंद मराठा महासंघ मध्य प्रदेश इंदोर येथे आज सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांचे साक्षीने मध्य प्रदेश अध्यक्ष पदी मल्हारराव कदम यांची निवड राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी जाहीर केली या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सातळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे गुजरात राज्य प्रमुख देवेश माने वडोदरा अध्यक्ष प्रदीप मोरे  मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम इंदोर शहर अध्यक्ष मनीष येरुणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

      या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले इंदोर येथे आज सुमारे पाच लाख मराठा बांधव राहतात परंतु सत्तेचा वाटा अल्प प्रमाणात आहे येथे महापालिका आपला महापौर असायला हवा मात्र आपले सहकारी बांधव सर्व राजकीय पक्षांनी वाटून घेतले आहे आता जागे व्हा व एका छताखाली या असे प्रतिपादन भोसले यांनी केले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा नवनिर्माण सेना प्रमुख चंद्रकांत कुंजीर मिलिंद दिघे पुंडलिक शिंदे संजय शिंदे भूपेंद्र अडसुळे अशोक अमानापूर्कर गोविंदराव जगताप रविंद्र गट निवेश  देशमुख राजेश निकम ऋतुराज कदम मनिष जगताप आदी मान्यवरांसह हजारो लोक उपस्थित होते या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंद मराठा महासंघ जाहीर पाठिंबा देणार आहेत असे जाहीर केले

No comments