web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा: संजय राऊत

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव -  मुंबई

कोणाच्या ओठाखाली थोडं रक्त आलं म्हणून भाजपचे नेते लगेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी करत आहेत. पण उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत १७ बलात्कार झाले. त्यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात ती एकत्रच लावा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपचं शिष्टमंडळ सातवेळा केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले आहे. सारखे तेच विषय घेऊन भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत जाते. उत्तर प्रदेशातही तीन महिन्यांत १७ बलात्कार झाले. मग तिकडेही राष्ट्रपती राजवट आणणार आहात का? महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना कामधंदा उरलेला नाही. ही सगळी ढोंगं चालली आहेत. हे दोन चार लोक जातात, दिल्लीत उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. हे महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे. असंच सुरु राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना नागरिक दिसतील तिथे चपला मारतील. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

No comments