web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ.शिवाजी पवार राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित;मुरबाड तालुक्यात कौतुक अभिनंदनाचा वर्षाव

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

डॉ.शिवाजी पवार पंचायत समिती मुरबाड येथे कार्यरत असुन ग्रामीण रूग्णालय येथे ते कुष्टरोग निदान व उपचारकरिता सदैव गोरगरीब जनतेच्या हितासाठी तत्पर असतात त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन दिनांक 29/03/2022 रोजी संपुर्ण राज्यात उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल राज्यात त्यांचा 2 क्रमांकचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले. 

डॉ शिवाजी पवार हे उमरोली गावाचे रहिवाशी असुन त्यांनी 1986 पासुन गोरगरीब सामान्य जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंन्द्र टोकावडे धसई या ठिकाणापासुन सेवा देण्याचे काम सुरू केले माझ्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेची कोणतीही कमी भासू नये यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट असा राज्यस्तरीय पुरस्कार देवुन त्यांचा सन्मान केल्याने त्यांचा मुरबाड तालुक्यात कौतुक होत आहे.डॉ शिवाजी पवार हे सध्या मुरबाड ग्रामीण रूग्णालय येथे कुष्टरूग्णांनवर उपचार करत आहेत.

No comments