web-ads-yml-728x90

Breaking News

शिरोळ तालुक्यात नवे औद्योगिक क्षेत्र स्थापन्यासाठी संभाव्य जागेचे त्वरित सर्वेक्षण करावे – उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

स्त्रोद्योगाप्रमाणे सर्व उद्योगांना वाव असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी अनुकूल व संभाव्य जागेचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज दिले.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, वीज, पाणी व दळणवळणाच्या सोयी-सुविधा असलेल्या शिरोळ तालुक्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. इचलकरंजी वस्त्रोद्योग व प्रक्रिया विस्तारासाठी येथे 250 चौ.एकर क्षेत्रामध्ये प्राथमिक स्वरुपात मिनी एमआयडीसी स्थापन करणे शक्य आहे. महामंडळाच्या संबंधित  अधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील या जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना कु.तटकरे यांनी दिल्या.शिरोळ तालुक्याचे औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्त्व व्यक्त करताना वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, बारमाही वाहणाऱ्या कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या मुबलक पाण्यामुळे येथील क्षेत्र बागायती आहे. औद्योगिकदृष्ट्या सर्वस्तरावर अनुकूल असलेल्या या जमिनीवर सहकारी तत्वावर वस्त्रोद्योगावर आधारित सात औद्योगिक वसाहती आहेत. या बागायत जमिनींची किंमत नव्या उद्योजकांना परवडणारी नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत येथे औद्योगिक विकास केल्यास येथे उद्योग वाढीस चांगला वाव आहे, असे श्री.यड्रावकर यांनी सांगितले.

No comments