web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुढील उन्हाळ्यापूर्वी अमृत योजना कार्यान्वित होण्यासाठी व-२७- गावांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत ! महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवकल्याण, ठाणे

पुढील उन्हाळ्यापूर्वी अमृत योजना कार्यान्वित होण्यासाठी व-२७-गावांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. काल महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या अमृत योजनेच्या बैठकीत बोलतांना त्यांनी या सूचना दिल्या सदर बैठकीस शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता राजीव पाठक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता फेगडे व महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. २७-गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सदरचे काम मिशन मोडवर करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या. टॅपिंग वनद्वारे-१८-गावांना पाणी पुरवठा होणार आहे. सदर टॅपिंग वनची अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्यासही त्यांनी संबंधितांस आदेशित केले. अमृत योजनेअंतर्गत एकूण  ११-जलकुंभाचे काम चालू असून उर्वरित ज्या जलकुंभसाठी अद्यापपर्यंत जागा मिळालेल्या नाहीत, त्या जागा त्वरित ठेकेदाराच्या ताब्यात देण्यासाठी नगररचना विभागाच्या सुचनांनुसार घारिवली,घेसर,उंबरली व नांदिवली डी मार्ट येथील जागा सात दिवसात उपलब्ध होणार आहेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला जलकुंभासाठी दिलेल्या  ७-जागांच्या, प्रत्यक्ष जागेवर भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सर्व्हे पूर्ण झालेला असल्याने तहसीलदारांना या जागा महापालिकेला त्वरित हस्तांतर करण्याबाबतच्या सूचना दिल्या.अमृत जल योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी यापुढे आयुक्त दालनात प्रत्येक सोमवारी बैठक आयोजित केली जाणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास या योजनेसाठी-P.M.C. म्हणून शासनाने नियुक्त केले असल्याने त्यांनी त्वरित या योजनेत लक्ष घालून त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या आराखडयाला मान्यता देण्याबाबत आयुक्तांनी सुचना दिल्या व येत्या पंधरा दिवसात उपलब्ध जागेच्या आराखडयाला मान्यता देणेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सहमती दर्शविली.

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अमृत योजनेसाठी आवश्यक असलेले उर्वरित push through कामाचे टेंडर व मेकॅनिकल equipment चे टेंडर येत्या एक महिन्यात तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले त्याचप्रमाणे उर्वरित ग्रॅव्हिटी मेंनचे काम पूर्ण करण्याबाबत आयुक्तांनी या बैठकीत दिले.

No comments