web-ads-yml-728x90

Breaking News

सोमैया यांच्याकडून गृहसचिवांची भेट! आवश्यक ती कारवाई करण्याची ग्वाही दिल्याची माहिती

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव -  नवी दिल्ली

भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमैया यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे. ते गृहसचिवांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेकडून वारंवरा माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये मला कित्तेगदा मला मारण्याच प्रयत्न केला आहे. त्यावर गृहसचिवांनी एक कमिटी नेमून या प्रकरणासंदर्भात तपासणी करण्यासाठी राज्यात पाठवली जाईल अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे. ( Home Secretary Meet Kirit Somaiya ) दरम्यान, यावर राज्याचा गृहविभागही वारंवार दुर्लक्ष करत असल्याची माहितीही आपण गृहसचिवांना दिली आहे असही ते म्हणाले आहेत. येथे पोलिसांची मदत घेऊन मला माहण्याचा प्रयत्न केला असही सोमैया म्हणाले आहेत.

No comments