web-ads-yml-728x90

Breaking News

पंतप्रधान मोदींनी स्वीकारला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar Award ) यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना सन्मानित करण्यात आले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. मंगेशकर कुटुंबियांनी मोदींचे यावेळी आभार मानले. यावेळी बोलताना सुधीर फडकेंमुळे माझी लता मंगेशकर यांच्याशी भेट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशासाठी मंगेशकर परिवाराचे मोठे योगदान असून मला मिळालेला पुरस्कार देशाला अर्पण करतो, असेही ते म्हणाले.

No comments